बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला एकतर्फी विजय मिळाला. त्यामुळे लवकरच बिहारमध्ये एनडीए सरकार सरकार स्थापन करणार आहे तर, बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी राजदचे तेजस्वी यादव यांची निवड झाली. कोणत्याही विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळविण्यासाठी, पक्षाला सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के जागा मिळवाव्या लागतात. बिहारमध्ये या आकडेवारीनुसार, २५ जागा (२४३ पैकी १०%) मिळवणे आवश्यक आहे. या विधानसभा निवडणुकीत राजदने २५ जागा जिंकल्या आहेत.
२४३ जागांच्या विधानसभेत एनडीएने २०२ जागा मिळवून बहुमत मिळवले. भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या, त्यानंतर जेडी(यू)ने ८५ जागा जिंकल्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या एलजेपी(आरव्ही)ने १९ जागा जिंकल्या आणि इतर नऊ जागा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) या छोट्या पक्षांनी जिंकल्या. आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला फक्त ३५ जागा जिंकता आल्या.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या फरकाने पिछाडीवर राहिल्यानंतर, तेजस्वी यांनी भाजपच्या सतीश कुमार यांचा १४,५३२ मतांनी पराभव करून राघोपूरचा कौटुंबिक बालेकिल्ला कायम ठेवला. यानंतर तेजस्वी यादव यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग आणि भाजपने बिहारच्या निकालांमध्ये फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी केला.
उदित राज म्हणाले की, “तेजस्वी यादव यांचा विजय भाजप आणि निवडणूक आयोगाने सुनिश्चित केला, कारण ते संध्याकाळपर्यंत पिछाडीवर होते. निवडणुका निष्पक्ष म्हणून सादर करण्यासाठी त्यांनी त्यांचा विजय सुनिश्चित केला. त्यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी एसआयआर आणि ईव्हीएमचा वापर केला जात आहे. निवडणुका आधीच ठरलेल्या होत्या आणि त्यांना नेमके काय घडेल हे माहित होते,” असे राज यांनी म्हटले.
हेही वाचा..
“ऑपरेशन सिंदूर ८८ तासांचा केवळ एक ट्रेलर; भविष्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी तयार”
बलुच बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकवरच लावली स्फोटकं, जीवितहानी नाही
माई-बहिण सन्मान योजना आधी घरातून सुरु करा
बंगालमधील एसआयआरमुळे घुसखोर बांगलादेशात पळू लागलेत!
महागठबंधनला बिहार निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. राजदच्या जागांची संख्या ७५ वरून २५ वर घसरली. राज्यातील त्यांचा महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्या निवडणुकीत केवळ १९ जागांवर विजय मिळवता आला.







