26.4 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरक्राईमनामाअनिल देशमुखांच्या मुलावर अटकेची टांगती तलवार?

अनिल देशमुखांच्या मुलावर अटकेची टांगती तलवार?

Google News Follow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर आता त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले जात आहे. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.

अनिल देशमुखांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली होती. तर त्यांच्या कोट्यावधीच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या याच प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली असून त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला देखील सक्तवसुली संचालनालया मार्फत समन्स पाठवण्यात आले होते.

ऋषिकेश देशमुख यांनी आज हजर राहण्यासाठी हे समन्स पाठवले गेले होते. पण ऋषिकेश देशमुख हजर राहणार नसून त्यांनी पंधरा दिवसांची वेळ मागितली आहे. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आली. याच वेळी त्यांनी ऋषिकेश देशमुख हे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

आर्यन खानने एनसीबी समोर लावली हजेरी

शिवसेनेला दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

आदिगुरू शंकराचार्यांचे ध्यानस्थ शिल्प देशाला अर्पण

अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात खटला सुरू होता. देशमुख आरोपी नाहीत त्यामुळे त्यांनी केवळ चौकशीसाठी यावे असे प्रतिज्ञापत्र ईडीने न्यायालयात सादर केले होते. अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिले. पण असे असतानाही अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांनाही अटक केली जाऊ शकते असा दावा वकील इंद्रपाल सिंग यांनी केला आहे. त्यामुळे कायदेशीर आयुधे वापरून ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा