30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरक्राईमनामाआजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

Google News Follow

Related

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध चांदीवाल आयोगात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सचिन वाझे याला आयोगासमोर हजर करण्यात आलं नाही. काल सचिन वाझेच्या मेडिकल रिपोर्टनुसार त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला हजार करता आलं नाही. त्यामुळे आता २२ नोव्हेंबर रोजी सचिन वाझेला आयोगासमोर हजार करण्यात येणार आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्या वकिलाकडून पॉवर ऑफ ऍटर्नीसाठी आयोगाकडे अर्ज करण्यात आला आहे. या अर्जाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि संजीव पलांडे यांच्या वकिलांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर सिंग यांनी त्यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेला जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठीही अर्ज केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. सुरवातीचा आठवडा या प्रकरणात सचिन वाझे हे तपास अधिकारी म्हणून काम करत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी फडणवीस यांनी वाझेंबद्दल संशय व्यक्त केला होता. “जिलेटीनने भरलेल्या गाडीची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी वाझे तिथे पोहोचलेले होते. हिजबुल मुजाहुद्दीनच्या धमकीचे खोटे पत्रही वाझेंनाच सापडले होते. स्कॉप्रिओचे मालक असलेले मनसुख हिरेन हे वाझे यांच्या आधीपासूनच संपर्कात होते.” असा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला आणि त्याबाबतचे पुरावे देखील दिले.

हे ही वाचा:

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीत युतीची चर्चा?

‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी

“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’

दरम्यान, सचिन वाझे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता. पण सचिन वाझे याच्या छातीत दुखू लागल्यामुळे १५ ते २० दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचार सुरू होते. सचिन वाझे याच्या रक्तवाहिनीत ३ मोठे ब्लॉक आढळून आले होते. त्यामुळेच त्याला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. वाझेच्या वकिलांनी हा दावा न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने वाझेला रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा