29 C
Mumbai
Wednesday, June 29, 2022
घरराजकारण'...तर राजकारण सोडेन!' संदीप देशपांडे कडाडले

‘…तर राजकारण सोडेन!’ संदीप देशपांडे कडाडले

Related

गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे आज माध्यमांसमोर प्रकटले. गुरुवार, १९ मे रोजी मुंबई येथील सत्र न्यायालयाने देशपांडे आणि धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

यावेळी संदीप देशपांडे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आमच्या धक्क्याने महिला पोलिस अधिकारी जमिनीवर पडल्या नाहीत. आम्ही त्यांना धक्का दिला नाही. आम्ही महिला पोलिसांना धक्का दिल्याचं इतर कुठेच दाखवल्यास राजकारण सोडून देईन असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी

आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

आम्ही पळून गेल्याचे सगळे सांगत होते. आम्ही गायब झालो आहोत असं म्हटलं जात होतं. पण जर मी गायब झालो असे म्हणतात तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख कुठे लपवले होते? असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला आहे अनिल देशमुख हे तर राज्याचे गृहमंत्री होते मग आमची बदनामी का केली जाते असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही सातत्याने महाविकास आघाडी सरकार विरोधात आवाज उठवत आहोत. त्यामुळेच आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारने गुन्हे दाखल केले आहेत असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. पण आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे आहेत. त्यांचे सरकार आहे त्यामुळे वाटेल ते गुन्हे दाखल करत आहेत. उद्या खुनाचाही गुन्हा दाखल करतील. पण उद्या सत्ता आमची येईलच ना? असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. तर आज तुमचे सरकार आहे जे करायचे ते करा असे आव्हानही ठाकरे सरकारला दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,941चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
11,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा