26 C
Mumbai
Tuesday, July 23, 2024
घरराजकारणईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी

ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी साधला निशाणा

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघात झालेल्या मत मोजणीबाबत आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून टीका केली जात आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय निरुपम यांनी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत टीकास्त्र डागले आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर ४८ मतांनी विजय झाला. मात्र विरोधकांनी या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. अशातच इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रातील खोटी बातमी पोस्ट केली. त्या सर्वांनी माफी मागायला हवी. जर वृत्तपत्राने माफी मागितली आहे तर आदित्य ठाकरेंनीही माफी मागायला हवी. निवडणूक आयोगाकडून पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना एका वृत्तपत्राच्या खोट्या बातमीचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या निकालावर चुकीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी, असं ठाम मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

जम्मू-काश्मिरातील रियासी हल्ल्याची तपासणी एनआयएच्या हाती!

‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

झारखंडच्या सिंगभूममध्ये चकमक, ४ नक्षलवादी ठार!

ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. जर ईव्हीएम हॅक होऊ शकते मग काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून आल्या असत्या का? सुमारे एक लाख मतांची मोजणी शिल्लक असताना उबाठागटाचे अमोल किर्तीकर विजयी झाले अशी बातमी संध्याकाळी ५.४० वाजता कशी व्हायरल होते? मतमोजणीवेळी तिथे मोबाईल घेऊन जाणाऱ्या विरोधात वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार निवडणूक अधिकारी यांनी केली आहे. त्याबाबत चौकशी व कारवाई व्हावी. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न उबाठाकडून केला जात आहे. खोट्या बातमीमुळे पोलीस, निवडणूक अधिकारी यांना बदनाम केले गेले. आमच्या पक्षाचीही बदनामी झाली त्याबद्दल न्यायालयात दाद मागण्याबाबत पक्ष प्रमुख ठरवतील असंही संजय निरुपम यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा