31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
घरराजकारणसंजय राऊतांचे युपीए २ चे इमले

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. यावरुन कालच काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले होते. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.याशिवाय काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगितले होते. परंतु तरीही आज संजय राऊतांनी पुन्हा तोच सूर आळवला आहे. शिवाय त्यावर भर देत युपीए २ चे पिल्लूही सोडून दिले.

काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे  यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले होते. संजय राऊत यांनी युपीए अध्यक्षपदाचा विषय राष्ट्रीय असून यावर राज्यात बसून बोलू नये. जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधींसारख्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली तर त्याला आम्ही उत्तर देऊ. पण हा राज्याचा विषय नसल्याने राज्यातल्या नेत्यांनी यावर बोलू नये. असे खोचक उत्तर राऊतांनी नाव न घेता नाना पटोलेंना दिले.

हे ही वाचा:

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

याशिवाय दिल्लीत युपीए २ सुरु करण्याच्या चर्चा सुरु आहेत. विरोधी पक्ष एकत्र राहावेत आणि काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे, त्यामुळे युपीए २ न होता युपीए एकच राहावा अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले. युपीए २ ची तयारी कोण करत आहे? या प्रश्नावर मात्र राऊतांनी उत्तर देणे टाळले.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. मी कोवीड पेशंट म्हणुण एडमीट आहे,एव्हडी बोगस व्यवस्था पहातोय की लाज वाटते ,आपण कोठे राहतोय,खरच नक्सली लोक जे वागतात ते योग्य वाटते कारण प्रशासन व्यवस्था फक्त फोटो व दिखाव्याचे कार्य करत आहे म्हणुण एव्हड्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मध्ये ही बिमारी वाढत आहे केवळ ढिसाळ प्रशासना मुळे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा