33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरक्राईमनामासंजय राऊत यांना बजावली १०० कोटींची मानहानीची नोटीस

संजय राऊत यांना बजावली १०० कोटींची मानहानीची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील वक्तव्य आले अंगलट

Google News Follow

Related

रोज सकाळी उठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर बेताल आरोप करण्याची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सवय लागली आहे. राऊत यांनी अनेकदा आक्षेपार्ह विधाने केली आहेत. पण आता हि विधाने राऊत यांच्या अंगलट आली आहेत. उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १०० कोटींची नोटीसही पाठवण्यात आली आहे.त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढू शकतात.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर आरोप करत आहेत. खोके सरकार, मिंधे सरकार अशी खोचक टीकाही वारंवार केली आहे. पण इतक्या सगळ्या टीका होऊनही मुख्यमंत्री शिंदे यांनी कधीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी कधीही या आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही. पण आता संजय राऊत यांच्या टीका टिप्पणीवर लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशन या संस्थेने जोरदार आक्षेप घेतला आहे.

या संस्थेने मानहानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

संजय राऊत हे सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सतत अपमान करत आहेत. संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डागाळल्याचा दावा एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशनचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष अमर लोखंडे यांनी केला आहे. संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर आरोप करत असभ्य भाषेचाही वापर केला असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’

अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?

घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच

मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत संजय राऊत यांनी वेळोवेळी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात चाटुगिरीचे वक्तव्य केल्याने समाजात त्यांचा अवमान झाल्याचा आरोप या नोटीसमध्ये केला आहे. लोखंडे यांनी आपल्या वकिलाच्या मार्फत ही नोटीस पाठवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा