32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारणसंजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; नितेश राणे यांच्या दाव्याने महाराष्ट्रात नवा भूकंप

संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; नितेश राणे यांच्या दाव्याने महाराष्ट्रात नवा भूकंप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचा मुहूर्तही सांगितला

Google News Follow

Related

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील ढवळून निघालेले राजकीय वातावरण शांत होत नाही तोच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मोठे विधान करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे शिवसेना सोडणार आहेत. संजय राऊत १० जून रोजी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या या विधानानंतर आता नवीन राजकीय चर्चेला पण फुटले आहे.

नितेश राणे माध्यमांशी बोलतांना आपल्या दाव्यात म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होईल. संजय राऊतने राष्ट्रवादीत असे कळवले आहे की सांगितले, आता उद्धव ठाकरेंकडे पक्ष नाही, त्यांचे काही खरे नाही, ते मला पुन्हा खासदार करु शकत नाही. मला राष्ट्रवादीत घ्या. उद्धव ठाकरेंबरोबर राहण्यात रस नाही. संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार हे नक्की त्यांच्या त्याबाबत बैठकाही सुरु आहेत.

संजय राऊत शिवसेना का सोडणार आहेत? याचं कारण सांगतांना नितेश राणे म्हणाले, माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी संजय राऊतची भूमिका पाहिली असता हे लक्षात येते. अजित पवारांनी पक्ष सोडल्यास मी लगेच पक्ष प्रवेश करतो ही राऊतांची भूमिका आहे. त्यामुळे राऊत सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहे. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ४ वाजता संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील असेही नितेश राणे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या !

‘अजित पवारांचं वागण बघूनचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’

६० कोटींच्या अनुदानाचा निर्णय ‘बेस्ट’ नाही !

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मध्यप्रदेशात टॅक्स फ्री; आता महाराष्ट्रातही मागणी !

शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा देशभरातल्या नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र उद्धव ठाकरेंनी पवारांना फोन केला नाही. यापाठिमागे संजय राऊत आहेत जे ठाकरे-पवार भेट होऊ देत नाही. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्यासाठी राऊत हे षडयंत्र करत आहे. राऊत स्वतः चार चार वेळा जाऊन त्यांना भेटतो असा दावाही नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.

राऊत साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत होता. तो बाळासाहेबांचा झाला नाही. तो तुमचा होऊ शकणार नाही. हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय, असंही ते म्हणाले. राऊतांनी ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली. आता राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंना चित्र स्पष्ट होईल. एका माणसामुळे पक्ष फुटला हे त्यांना कळेल, असंही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा