30 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरराजकारणसंजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा  

Google News Follow

Related

“संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात,” अशी घाणाघाती टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारचा अंत्यविधी आम्ही थाटात करु, असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना केले होते. यानंतर भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानासाठी गोंदिया जिल्ह्यात असताना त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारे सरकार आहे, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हे ही वाचा:

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

चार जवान शहीद म्हणजेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ कायम असल्याचे संकेत

बॉलीवूडमधील सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर

लिबियात हाहाःकार, महापुरामुळे २० हजार मृत्यू

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरीरावरुन टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना जोकरचे कपडे पाठवले होते. “एखाद्या नेत्याच्या शरीरावरुन टीका करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे नेत्यांच्या टिवल्या-बावल्या करतात आणि जनतेला हसवतात. हसवण्याचे काम हे जोकर करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना जोकरचे कपडे आम्ही पाठवले,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,033अनुयायीअनुकरण करा
100,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा