32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर राजकारण आता खिंडार नको! काँग्रेसमधील ज्येष्ठांचा गांधी कुटुंबाला पुन्हा आग्रह

आता खिंडार नको! काँग्रेसमधील ज्येष्ठांचा गांधी कुटुंबाला पुन्हा आग्रह

Related

उत्तरप्रदेशातील राजकारणाला खिंडार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ सदस्यांनी यासाठी पावले उचलण्याची याचना करायला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते एम वीरप्पा मोईली आणि कपिल सिब्बल यांनी एकूण कार्यशैलीत बदल व्हायला हवे हे उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. पक्षाला काहीतरी मोठा बदल करण्याची गरज असल्याचे, मोईली यांना सांगावे लागले आहे. गेल्या वर्षी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ सदस्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केलेल्या आवाहनाचा पुन्हा एकदा उल्लेख कपिल सिब्बल यांनी करत काँग्रेसच्या बुडत्या जहाजाला आता वाचविण्याची गरज आहे, असे सुचविले.

हे ही वाचा:
पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या

प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही

नेत्यांना जबाबदारी सोपवताना सुद्धा पक्षनेतृत्वाने सारासार विचार करणे आता गरजेचे झाले आहे. असेही मोईली यावेळी म्हणाले. जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशामुळे खासकरुन राहुल गांधींनाही मोठा धक्का बसला आहे

किमान पक्षाने आमचे म्हणणे ऐकावे असे मत यावेळी सिब्बल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आपापसात हा लढा देताना पक्षाची हानी होतेय हे कुणाच्याच लक्षात येत नाहीये. सिबल यांनी थेट गांधी कुटुंबियांचे नाव न घेता सांगितले की, जर वरिष्ठच ऐकत नसतील तर पक्षाची घसरण ही होणारच.

२०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसला खूप बदलावे लागेल असे मोईली यांनी सुचविले होते. परंतु पक्षाने मात्र ते म्हणणे ऐकले नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षाच्या संघटनात्मक फेरबदल करण्याच्या उद्देशाने पत्र लिहिले होते त्यामध्ये मोईली यांचाही समावेश होता.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा