28 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरराजकारणशरद पवार यांची तब्येत बिघडली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

शरद पवार यांची तब्येत बिघडली; रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटचे) वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख शरद पवार यांची सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना बारामती येथील गोविंद बाग या त्यांच्या खासगी निवासस्थानातून पुण्याकडे तातडीने उपचारासाठी हलवण्याचे आले.

शरद पवारांच्या घशात संसर्ग आणि कफ हा त्रास दिसून आला, तसेच श्वास घेताना काही प्रमाणात अडचणी जाणवत होत्या. यामुळे त्यांच्या जवळील कुटुंबीय आणि वैद्यकीय टीम यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह जावई सदानंद सुळे देखील होते.
हे ही वाचा:
ग्रामीण निवडणुकांतही भाजपा अव्वल!

आयबीचे अहवाल पाकिस्तानला पुरवले; हिमंतांच्या निशाण्यावर गौरव की सोनिया?

२०२६-२७ मध्ये भारत जी २० देशांना मागे टाकत होणार नंबर १

एसआयआर प्रक्रियेत अडथळा खपवून घेणार नाही!
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिथल्या वरिष्ठ वैद्यकीय टीमने शरद पवार यांची सखोल तपासणी सुरू केली. रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कर्डियोलॉजिस्ट आणि व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रँट यांनी सांगितले की, डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेऊन आवश्यक तपासण्या करत आहे आणि त्यावरुन पुढे काय करायचे हे ठरवण्यात येईल’

सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र छातीमध्ये कफ व काही इन्फेक्शनचे लक्षणे असल्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत आहे. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार सध्या कोणतीही गंभीर स्थिती नसून सध्या त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेनंतर आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांकडून उपचारांचे तपशील जाणून घेतले. भेटीवेळी त्यांनी पवार कुटुंबियांशी चर्चा करत धीर दिला

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा