27.7 C
Mumbai
Thursday, July 17, 2025
घरराजकारणअजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले

अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले

जलसंपदा घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याचा उल्लेख केला

Google News Follow

Related

अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या छत्रछायेखालून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दोन गटांमध्ये ठोसेबाजी वाढली आहे. छगन भुजबळांनी तेलगी प्रकरणावरून शरद पवारांना लक्ष्य केल्यानंतर आता शरद पवारांनीही अजित पवारांनाच अडकविण्याचा प्रयत्न केला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत सुरू असलेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत शरद पवारांनी जलसंपदा खात्यातील घोटाळा आणि शिखर बँकेचा उल्लेख करून थेट अजित पवारांवरच निशाणा साधला.

 

शरद पवारांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आगामी निवडणुकांत अजित पवार गटाला जनताच जागा दाखवून देईल पण जलसंपदा घोटाळा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशीही नरेंद्र मोदी सरकारने करावी. एकप्रकारे शरद पवारांनी अजित पवारांसमोर दंड थोपटले आहेत. अजित पवार वेगळे झाल्यापासून त्यांच्यावर थेट टीका केली जात नव्हती पण आता हळूहळू दोन्ही गटांनी एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात केल्याचे दिसते आहे.

 

मागे दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना लक्ष्य केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी तेलगी प्रकरणात आपला राजीनामा का घेण्यात आला असा सवाल शरद पवारांना विचारला. आता शरद पवारांनी थेट अजित पवारांचीच चौकशी का केली जाऊ नये, अशी त्यांचे नाव न घेता मागणी केली आहे. त्यावरून हा संघर्ष येत्या काळात आणखी मोठा होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. I N D I Aच्या झालेल्या या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा राग आळवला.

 

I N D I A च्या दोन दिवसीय बैठकीच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी या विषयावर आपण चिंताग्रस्त असल्याचे सांगितले. नीती आयोगाची मुंबईत होणारी बैठक आणि मुंबईच्या विकास आराखड्याबाबतच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जात आहे, मुंबईला वेगळे केले जात आहे, याची ओरड सुरू झाली. याचसंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, नीती आयोगाने आराखडा तयार केला आहे.

 

ते म्हणाले की, आमचे महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई तोडण्याची हिंमत केली गेली नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगितले की, आम्ही सत्तेत असताना हिंमत नव्हती हा प्रस्ताव आणण्याची. पण आता हा प्रस्ताव होऊ देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सगळे पाश तोडून टाकू. मुंबईची व इतर शहरांची, राज्यांची स्वायत्तता अबाधित ठेवू.

 

हे ही वाचा:

सुनील राऊतांना पक्षात घ्यायला कोणी १०० रुपये पण देणार नाही

कुर्ल्यात गुंडाने केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडली घटना

लोखंडवाला १२० फूट डीपी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

चीनने जारी केलेल्या नकाशावर जयशंकर यांनी ठणकावले

प्रकाश आंबेडकरांना या कार्यक्रमाला का आमंत्रण दिले नाही असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांशी आमची युती आहे. या बैठकीत येण्यासाठी त्यांची इच्छा आहे की नाही हे बघावे लागेल. आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यामुळे आम्ही वेगळे होणार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा