23 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारण'खरे तर मनीष सिसोदिया यांना भारतरत्न द्यायला हवे'

‘खरे तर मनीष सिसोदिया यांना भारतरत्न द्यायला हवे’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला अजब दावा

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या बडबडीमुळे वारंवार वादात सापडत असतात. आता तर त्यांनी सीबीआयची छापेमारी झालेले दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील शाळांची स्थिती सुधारल्याबद्दल त्यांना भारतरत्न द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. गुजरातमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल गुजरातमध्ये प्रचार दौऱ्यावर आहेत. ते म्हणतात की, न्यूयॉर्क टाइम्सने आमच्या शिक्षणाच्या मॉडेलचे कौतुक केले आहे. पण सिसोदिया यांची प्रशंसा करण्याऐवजी त्यांना लक्ष्य केले जात आहे.

केजरीवाल यांनी असेही म्हटले की, लवकरच सिसोदिया यांना अटकही केली जाऊ शकते. एवढेच नव्हे तर कोण जाणे मलाही अटक होऊ शकते. गुजरात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळे केले जात आहे.

केजरीवाल यांनी गुजरातमधील भाजपा सरकारवरही टीका केली आहे. आम आदमी पार्टीचे सरकार जर इथे आले तर शिक्षण आणि आरोग्याच्या उत्तम सुविधा इथे उभारल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हे ही वाचा:

म्हणून कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

कोरोनामुळे आई बाप गेले; ‘या’ विद्यार्थ्यांना सरकार देणार मदतीचा हात

मेटे प्रकरणामुळे घेतला धसका; आमदारांच्या चालकांना शिकवणार ड्रायव्हिंग

१५३५ सालच्या मंदिरातून चोरांनी लांबवल्या पंचधातूंच्या ६ मूर्ती

 

केजरीवाल तर एवढेही म्हणाले की, खरे तर देशातील शिक्षण व्यवस्था सिसोदिया यांच्या हाती द्यायला हवी. गेल्या पाच वर्षात या माणसाने चमत्कार करून दाखविले आहेत. अशा माणसाच्या घरी तुम्ही सीबीआयच्या माध्यमातून छापेमारी करता? त्याला खरे तर भारतरत्न द्यायला हवे.

सोमवारी सिसोदिया यांच्यासह केजरीवाल हे गुजरात दौऱ्यावर होते. दोन दिवसांचा त्यांचा अहमदाबादचा दौरा आहे. साबरकाठा व भावनगर येथे त्यांच्या सभा आहेत. केजरीवाल म्हणतात की, जर सिसोदिया यांना अटक झाली तर पुढील तीन चार महिने शिक्षण व्यवस्था कोलमडून जाईल. कुणाचा फायदा आहे त्यात?

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा