28 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरराजकारण'इक्बाल सिंग चहल यांच्या नातेवाईकांकडून सोनू निगमला धमकी'

‘इक्बाल सिंग चहल यांच्या नातेवाईकांकडून सोनू निगमला धमकी’

Related

आमदार अमित साटम यांचे आरोप

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा नेते आणि आमदार अमित साटम यांनी एका नव्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे नातेवाईक सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना धमकी देत असल्याचा गौप्यस्फोट केला.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे नातेवाईक राजिंदर हे सुप्रसिद्ध गायक, पद्मश्री पुरस्कार विजेते सोनू निगम यांना धमकी देत आहेत. सोनू निगम यांनी फुकटात शो करावा यासाठी त्यांना धमकी दिली जात असल्याचे अमित साटम म्हणाले. सोनू निगम यांनी तसे न केल्यास त्यांना त्यांच्या घरासाठी नोटीस पाठवून त्यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेची सरकारने नोंद घेऊन इक्बाल चहल आणि राजिंदर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

हे ही वाचा:

नागराज मंजुळे आता डॉक्टर नागराज मंजुळे!

“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा  

बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व

पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड 

बॉलिवूड गायक सोनू निगम हा लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. सोनू निगमचे लाखो चाहते आहेत. सोनू निगम हा फक्त चित्रपटातच गाणी गात नाही तर लाइव्ह परफॉर्मन्सही करतो. परदेशातही सोनू निगम हा अनेक शो करतो. मात्र, आता या प्रकरणामुळे सोनू निगम चर्चेत आला आहे. त्याला धमक्या दिल्यात जात असल्याचे प्रकरण आता समोर आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा