31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरक्राईमनामाअटक झालेले सोरेन हे झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री

अटक झालेले सोरेन हे झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री

Google News Follow

Related

हेमंत सोरेन हे अटक झालेले झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी त्यांचे वडील शिबू सोरेन आणि मधु कोडा यांनाही अटक झाली होती. हेमंत सोरेन यांनी २९ डिसेंबर, २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
१५ नोव्हेंबर, २००० रोजी झारखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्यात आतापर्यंत सहा मुख्यमंत्री झाले असून येथे तीनवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केवळ भाजपचे रघुबर दास यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ (२०१४ ते २०१९) पूर्ण केला आहे.

मधु कोडा

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना त्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. आर्थिक गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सन २००६ ते २००८ दरम्यान कोडा हे यूपीए सरकारशी आघाडी करून मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोळसा आणि खाणीच्या जागांचे वाटप करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने त्यांच्यावर केला होता. अशा प्रकारे गैरकृत्ये करून कोडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे चार हजार कोटी रुपये कमवले होते, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले होते.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची १४४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. सन २००९मध्ये कोडा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सन २०१३मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली. सन २०१७मध्ये त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांचा तुरुंगवास आणि २५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. हवाला व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेच्या अन्य चार प्रकरणांतही ते दोषी ठरले होते.

शिबू सोरेन

हेमंत सोरेन यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना ५ डिसेंबर, २००६ रोजी दिल्ली न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली होती. सन १९९४मध्ये त्यांचे खासगी सचिव शशीनाथ झा यांचे अपहरण आणि हत्येत त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांना शिक्षा ठोठावली तेव्हा ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कोळसा मंत्र होते. मात्र सोरेन यांच्याविरोधात सबळ पुरावे न आढळल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्ट, २००७मध्ये सीबीआयला खडसावून शिबू सोरेन यांची मुक्तता केली होती. तर, एप्रिल, २०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून सोरेन यांची त्यांच्या खासगी सचिवाच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.

हे ही वाचा:

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; कर रचनेत कोणताही बदल नाही

३० वर्षांनंतर व्यासजींच्या तळघरात पूजा-अर्चेला सुरुवात!

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

शशीनाथ झा हे मे १९९४पासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह रांची येथे आढळला होता. संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकावा म्हणून तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी सोरेन आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य सदस्यांना कथित लाच दिल्याचे झा यांना माहीत होते, असा दावा करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा