31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरराजकारण२०२४च्या निवडणुकीनंतर 'सपा' साफ!

२०२४च्या निवडणुकीनंतर ‘सपा’ साफ!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विरोधकांवर घणाघात

Google News Follow

Related

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत.भाजप उमेदवार डॉ.भोला सिंह यांच्या समर्थनार्थ जहांगीराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संबोधित केले.यावेळी संरक्षणमंत्र्यांनी सपा आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजनाथ सिंह म्हणाले की, भाजप जे म्हणते ते करूनच दाखवते. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात देशातील जनतेला जे वचन दिले होते ते पूर्ण केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाले झाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप नेत्यांनी संरक्षणमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री सभेला संबोधित करताना म्हणाले की, ‘आम्हाला २०१४ मध्ये जनादेश मिळाला आणि २०१९ मध्ये जनतेने आम्हाला आणखी आशीर्वाद दिला. जनतेच्या इच्छेनुसार जगात भारताचे नाव उंचावण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

हे ही वाचा:

ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही

परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!

२०२४ च्या निवडणुकीनंतर सपा संपेल आणि लोक काँग्रेसबद्दल विचारतील, कोणती काँग्रेस?. राजनाथ सिंह म्हणाले की, संसदेत बहुमत मिळताच आम्ही तिहेरी तलाकची प्रथा चिमूटभर मीठ टाकून संपवून टाकली. लोकसभा निवडणुकीनंतर लोक विचारतील की सपा कोण आहे, कारण सपा हा बेबंदशाहीचा पक्ष आहे. लोक विचारतील काँग्रेस कोण? ही या लोकांची अवस्था असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा