30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणपवार-दरेकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

पवार-दरेकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांची आज सकाळीच भेट झाली. भेटीचं नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. प्रवीण दरेकर यांचं सरकारी निवासस्थान अवंती इथे जाऊन रोहित पवार यांनी ही भेट घेतली.

प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे संचालक आहेत. रोहित पवार यांचं त्यासंबंधित काही काम होतं का? असा प्रश्न आहे. राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

हे ही वाचा:

लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी

धारावाईक रामायणातले राम, करणार भाजपाचे काम

अजानमुळे झोपमोड होत असल्याची तक्रार

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

वाझे प्रकरणातील पॅड्रोचा मूळ मालक शिवसेनेचाच

अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्याने अनेक तर्क लढविले जात आहेत. तसे पाहता रोहित पवार हे विविध पक्षातील नेत्यांना भेटत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा देशाला माहिती आहे. त्याचीही प्रचिती यानिमित्ताने आली आहे.  रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.  त्यांनी या मतदारसंघातील विकासकामांच्या निमित्ताने राजकारण्यांसोबत सेलिब्रिटींच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या.

“सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटकप्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला आहे”, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. दरम्यान ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा