27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरराजकारणहिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा

हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा

भाजपा आमदार नितेश राणे कडाडले

Google News Follow

Related

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी गणपती मिरवणुकांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील होते. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी हिंदुंविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना आणि मिरवणुकांना लक्ष्य करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “हिंदू सणासुदीच्या वेळी दगड मारले जातात. हिंदू लोक मिरवणुका काढू शकत नाहीयेत. पण, ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघाल्या की, आम्हाला भाईचारा शिकवला जातो. सर्वधर्मसमभाव बद्दल बोलले जाते. तेव्हा आम्ही कधी वाकड्या नजरेने त्यांच्या मिरवणुकांकडे पाहत नाही मग सर्वधर्मसमभाव हवा असेल तर याबाबतीतही समान न्याय मिळाला पाहिजे. जो नियम मुस्लिमांना तोच हिंदुना असावा. समान न्याय मिळाला तर हिंदू सकल मोर्चे दिसणारचं नाहीत. निषेध मोर्च्यांची गरज भासणार नाही. तसेच नितेश राणे, रामगिरी माहाराजांसारखी वक्तव्ये समोर येणार नाहीत,” असा घाणाघाती प्रहार नितेश राणे यांनी केला आहे. हिंदूंची बाजू घेणं, त्यांचा हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणे नाही, असं स्पष्ट मत नितेश राणे यांनी मांडले आहे.

महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये येत असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केल्याचे वृत्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, “जे दिल्लीत तक्रार करतायत त्यांनी एकदा तरी गणपती मिरवणुकीवर दगड मारले त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला पाहिजे होता. या घटनेवर त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे होता. ते जेव्हा आक्षेप घेतील तेव्हा तक्रार करायची गरजचं पडणार नाही आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात येईल,” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

भाजपा आमदार हाजी अरफात शेख यांनीही नितेश राणेंवर टीका केली होती. यावरही नितेश राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “हाजी अरफात शेख हे आमच्याच पक्षाचे आहेत. ‘सागर’ बंगल्यावर माझा आणि त्यांचा एकचं बॉस बसतो. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वक्तव्य करू नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. तर, गणपती मिरवणुकीवर दगड मारले गेले तेव्हा हाजी अरफात शेख यांनी पुढे येऊन निषेध व्यक्त करायला हवा होता एवढी आमचीही अपेक्षा आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

तेलुगू कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक

ड्रोन मार्फत हेरॉईनची तस्करी, पंजाब पोलिसांकडून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त !

पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत

रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

पुढे नितेश राणे असेही म्हणाले की, धर्माला आव्हान दिले जात असताना हिंदू म्हणून धर्माचे काम मी करत आहे. देवी देवतांच्या मिरवणुकीची विटंबना केली जाते, दगड मारले जात आहेत आणि म्हणूनचं हिंदू म्हणून धर्मासाठी मी लढत आहे. हिंदुत्वावर तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी बोलताना दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा