27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारण‘बाळासाहेबांचे विचार विसरलेले आमदारचं काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील’  

‘बाळासाहेबांचे विचार विसरलेले आमदारचं काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील’  

Related

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. सोमवार, २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस रंगणार आहे.

भाजपाने पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होऊ, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले.

भाजपा हा विजयसाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करत आहेत. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात त्यांचे काही चुकले नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना आमदार हे नाराज असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांना मत देणार नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा:

तोडफोड करणाऱ्या तरुणांना ‘अग्निपथ’चा मार्ग बंद

“मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही”

५०० वर्षांनी कालिका मंदिरावर पंतप्रधान मोदींनी फडकाविली पताका; मेहमूद बेगडाने तोडले होते मंदिर

बिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

“जनतेने त्यांना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेचा खरा आमदार कदापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीचे प्रेम आहे आणि जे बाळासाहेबांचे विचार विसरले असतील तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील,” असं  सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा