34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाबिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

बिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

Google News Follow

Related

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात काही राज्यांमध्ये आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. बिहारमध्ये आंदोलन अधिक तीव्र झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामध्ये आता कोचिंग सेंटर्सची प्रमुख भूमिका असल्याचे समोर आले आहे.

पटनाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांचे फोन तपासल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही कोचिंग सेंटर्सनी हिंसक निदर्शने, चिथावणी देणारे संदेश आणि व्हिडीओ पाठवले. त्यामुळे आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची चौकशी केली असता सात ते आठ कोचिंग सेंटर्सनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून या लोकांच्या फोनवर हिंसक संदेश पाठवल्याचे समोर आले आहे.

बिहारमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर १३८ गुन्हे दाखल केले गेले आहेत. तर ७१८ लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज पाहून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे.

हे ही वाचा:

फिनलँडमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कमाई

चीनला शह देण्यासाठी I2U2 सज्ज!

दाऊदच्या गँगकडून साध्वी ठाकूर यांना धमकीचा फोन

‘अग्निपथ योजने’संबंधी गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा करताच काही राज्यांमधील तरुणांकडून या योजनेला विरोध करण्यात आला. बिहारमध्ये या आंदोलनाचे पडसाद अधिक उमटले असून आंदोलकांनी रेल्वे, बस, वाहनं यांची जाळपोळ केली. दरम्यान, दंगलखोरांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा