28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियाफिनलँडमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कमाई

फिनलँडमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कमाई

Google News Follow

Related

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत त्याने ८६.८९ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८६.८९ मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याचा पुढचा प्रयत्न फाऊल ठरला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो भाला फेकताना घसरला. त्यानंतर त्याने पुन्हा धोका पक्तरला नाही. तर केशॉर्न वालकॉटने ८६.६४ मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल आपल्या नावे केलं. तर एंडरसन पीटर्सने ८४.७५ मीटरसह ब्रॉन्झ मेडलची कमाई केली.

हे ही वाचा:

दाऊदच्या गँगकडून साध्वी ठाकूर यांना धमकीचा फोन

‘अग्निपथ योजने’संबंधी गृहमंत्रालयाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या

१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

विशेष म्हणजे नीरजने फिनलँडमध्ये काही दिवसांपूर्वी नुरमी गेम्समध्ये ८९.३० मीटर अंतरापर्यंत भाला फेकत स्वतःचाच ऑलिम्पिकमधील आणि राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला होता. त्या स्पर्धेत काही फरकाने नीरज सुवर्णपदक पटकावू शकला नाही. क्रिडा जगतातील एक मानाची स्पर्धा असणारे कॉमनवेल्थ गेम्स यंदा इंग्लंडमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय खेळाडूंची घोषणा झाली आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्त्वाखाली ३७ खेळाडूंचं पथक इंग्लंडला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा