28 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरक्राईमनामासायबर चोरट्यांनी सीए तरुणीला दीड लाख रुपयांचा घातला गंडा

सायबर चोरट्यांनी सीए तरुणीला दीड लाख रुपयांचा घातला गंडा

Related

पुण्यात तरुणीला सायबर चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नाथ सिंग (रा. उत्तराखंड), लक्ष्मीधर भुयान (रा. ओदीशा) यांच्या विरोधात माहिती- तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याची बतावणी सनदी लेखापाल (सीए) तरुणीकडे सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर या तरुणीला दीड लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीच्या बँक खात्यातून साडेचारशे रुपये काढण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यानंतर पैसे नेमके कुठे खर्च झाले याबाबतची माहिती घेण्यासाठी तरुणीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधला आणि चौकशी केली.

हे ही वाचा:

बिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

५०० वर्षांनी कालिका मंदिरावर पंतप्रधान मोदींनी फडकाविली पताका; मेहमूद बेगडाने तोडले होते मंदिर

फिनलँडमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कमाई

चीनला शह देण्यासाठी I2U2 सज्ज!

मात्र, सायबर चोरट्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातील क्रमांकाऐवजी स्वतःचा क्रमांक तेथे टाकला होता. त्यानंतर या चोरट्यांनी तरुणीला एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. तरुणीने ऍप डाऊनलोड केल्यानंतर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून १ लाख ४६ हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचा प्रकार कळताच संबंधित तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी सनदी लेखापाल प्रशिक्षणार्थी म्हणून एका संस्थेत काम करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,921अनुयायीअनुकरण करा
10,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा