28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणसंतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा

संतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा

Google News Follow

Related

अवघ्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातला स्वप्निल लोणकर या होतकरू तरुणाने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वप्निलने हे टोकाचे पाऊल उचलले होते. एमपीएससी मार्फत परिक्षार्थींच्या मुलाखती घेऊन भरती होत नसल्यानेच स्वप्निलवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. पण स्वप्निलच्या मृत्यूनंतरही एमपीएससीने त्याची क्रूर चेष्टा केल्याचे समोर आले आहे.

मृत झालेल्या स्वप्नील लोणकरचे नाव एमपीएससी मुलाखतीच्या यादीत असल्याचे समोर आले आहे. एमपीएससीच्या मुलाखती वेळेत होत नाहीत यालाच कंटाळून स्वप्नीलने आपली जीवनयात्रा संपवली होती आणि आता एमपीएससी मुलाखतीला पात्र ठरलेल्या परीक्षार्थींच्या यादीमध्ये स्वप्निल चे नाव झळकलेले दिसत आहे. २०१९ पासून तब्बल दोन वर्षांच्या आसपासचा कालावधी उलटत आला तरी एमपीएससीच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत.

हे ही वाचा:

पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील यांचा राजीनामा

चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य

चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

राहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द

या घटनेवरून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभारावर सडकून टीका होताना दिसत आहे. मृत स्वप्नील चे नाव मुलाखतीच्या यादीतून वगळण्यातचे साधे सौजन्यही एमपीएससीला दाखवता आले नाही का? असा सवाल आयोगाबाबत उपस्थित केला जात आहे.

स्वप्नील लोणकर २०१९ मध्ये एमपीएससीची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मुलाखतीचा टप्पा पार करून सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न तो उराशी बाळगून होता. पण २०१९ साली आयोगाने मुलाखतीच घेतल्या नाहीत. त्यानंतर पूर्व देशात लॉकडाऊन लागला. २०२० सालीही एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली ही परीक्षाही स्वप्नील उत्तीर्ण झाला. पण त्याही मुलाखती पार पडल्या नाहीत. आयोगाच्या याच कारभाराला स्वप्निल कंटाळला होता. त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा उभा राहिला होता. सरकारी अधिकारी होऊन हे कर्ज फेडण्याचे त्याची इच्छा होती. पण आयोगाच्या कारभारामुळे एमपीएससीची भरती रखडली होती. या सर्व परिस्थितीने गांजून गेलेल्या स्वप्निलने आत्महत्येचा मार्ग स्विकारला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा