29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरराजकारण'ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेले सरकार'

‘ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेले सरकार’

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकरांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेले सरकार असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवर २०२४ मध्ये सत्ता आणतील, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते की, सत्ता न मिळाल्याने भाजपा अस्वस्थ झाली असल्याचा आरोप पवारांनी केला होता. त्यावरून दरेकरांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. दरेकर म्हणाले, ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेले सरकार आहे. मात्र हीच सत्ता देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवर राज्यात २०२४ मध्ये आणतील.

पुढे दरेकर म्हणाले, ठाकरे सरकार राज्यात धार्मिक तेढ निर्माण करत आहे आणि हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. मशिदीवरील भोंग्यांवरून ठाकरे सरकार काहीच बोलत नाही. या बेकायदेशीर भोंग्यांनी जनतेला त्रास होत आहे. राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आले होते. मात्र त्यांच्यावर राजद्रोहाचा कलम लावले. मग जे लोक नमाज पठण करतात त्यांनापण समज द्या, अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

हे ही वाचा:

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

‘ठाकरे सरकारचे वर्तन हिटलर पद्धतीने’

मशिदीवरील भोंगे उतरणार नाहीत! ठाकरे सरकारची भूमिका

सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांसंबधी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र त्या बैठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्थित राहणार नव्हते. अशा बैठकीला काय महत्त्व द्यायचे म्हणून भारतीय जनता पार्टीने या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच भाजपाने स्वतःची पत्रकार परिषेद घेत अनेक मुद्यांवर चर्चा केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा