32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरविशेषनिवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन

Google News Follow

Related

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे आज, २५ एप्रिल रोजी निधन झाले. माधव गोडबोले यांनी पुण्यामध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माधव गोडबोले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुजाता, मुलगा राहुल आणि मुलगी मीरा आहेत.

डॉ. माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. माधव गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएच्‌.डी. केली आहे.

हे ही वाचा:

कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेंचा जामीन मंजूर

ही म्याव म्याव करणारी शिवसेना

सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार

कर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या

माधव गोडबोले यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. त्यापूर्वी ते महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मुख्य वित्तसचिव पदावर देखील होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. माधव गोडबोले यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले होते. माधवराव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तके लिहिली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा