26 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकारणपंकजा ताई भाजप सोडून कुठेच जाणार नाहीत

पंकजा ताई भाजप सोडून कुठेच जाणार नाहीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

Google News Follow

Related

मातोश्रीचे दरवाजे खुले असले, तरी पंकजा मुंडे तिकडं जाणार नाहीत. पंकजा मुंडे भाजपा सोडून कुठेही जाणार नाहीत असं ठाम विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ठाकरे गटानं खुली ऑफरचं दिली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत असा विश्वास व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,मातोश्रीची दारं पंकजा मुंडे यांच्यासाठी खुली असली,तरी त्या कधीचं त्या दाराने प्रवेश करणार नाहीत. भारतीय जनता पक्ष हेच त्याचं घरं आहे. त्यामुळं हे मनातले मांडे मनातचं राहणार आहेत. अशाप्रकारची विधानं ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली तरी तो एक प्रकारचा राजकीय स्टंट आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी अशी विधानं करून पंकजा मुंडे यांना खुली ऑफर दिली आहे. आमच्या कन्येवर भाजपात अन्याय होत आहे असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांचं ठाकरे गटात स्वागतचं असेल, असंही सुनील शिंदे यांनी म्हटलंय.

 

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय
चंद्रकातं खैरे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यावर खरचं अन्याय होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये भाजपा मोठ्या प्रमाणात पसरवली. सुनील शिंदे हे छोटे आहेत. पण, त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी काहीतरी बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचा दरवाजा उघडा आहे. माझीही सूचना आहे की, पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात आलं पाहिजे, असंही ते त्यांनी सांगितलं.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला त्यांनी सलाम केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,999अनुयायीअनुकरण करा
61,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा