28 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारणठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे

ठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे

Google News Follow

Related

ठाकरे सरकारचा एसईबीसीच्या उमेदवारांसंदर्भातला निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’ असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. आधीच अडचणी आणि निराशाजनक वातावरणात असणाऱ्या विद्यार्थ्यांना खोटा दिलासा देऊन त्यांची फसवणूक केली जातेय, असंही ते म्हणाले यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. ठाकरे सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत असल्याचा गंभीर आरोप देखील पडळकरांनी केला.

ठाकरे सरकारने एसईबीसीच्या उमेदवारांसाठी निर्णय घेतला. पण हा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’ आहे. एकतर विद्यार्थी आधीच अडचणीत आणि निराशेत आहे. त्यात सरकार खोटे दिलासे आणि आश्वासने देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करतंय, अशा आरोपांचं खरमरीत पत्र आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

ठाकरे सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं रखडलेल्या नियुक्तांबाबत एक निर्णय घेतला आहे. ९सप्टेंबर २०२० पूर्वीच्या एसईबीसीच्या नियुक्त्या कायम राहणार आहेत. मात्र, स्थगितीनंतर एसईबीसीचा कोणताही लाभ घेता येणार नाही. सगळ्या एसईबीसीच्या पदांना ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय असणार आहे. खुल्या प्रवर्गात वर्ग करुन लवकरात लवकर नियुक्त्या देण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना दिले आहेत.

एमपीएससीने एसईबीसीच्या विद्यार्थ्यांनी एक सुधारित परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार आता एमपीएससीतील एसईबीसी प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. एसईबीसीच्या जागा खुल्या प्रवर्गात रुपांतरित करुनच आयोग निकाल लावणार आहे. एसईबीसीच्या जागा खुल्या गटात वर्ग करुन आरक्षणानुसार पदसंख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

“शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ आहे. प्रस्थापितांना भरती प्रक्रियेत जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे. यामुळेच ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा न्यायलयाच्या कचाट्यात सापडेल आणि महाविकास आघाडीच्या कृतीशुन्यतेला असह्यातेचं नाव देत सरकारला पळवाट मिळेल”, असे गंभीर आरोप पडळकरांनी पत्राच्या माध्यमातून केले आहेत.

हे ही वाचा:

खडसे यांच्या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी

बापरे! पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल

कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळे वैतागली

…आणि त्याने साकारली मोदी ‘बँक’

“अश्यानं हे सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत असल्याचा गंभीर आरोप देखील पडळकरांनी केला. राज्यात असे हजारो स्पप्निल आहेत, ज्यांना धीर देण्याची गरज आहे. पण धीर देण्याऐवजी सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत आहे”, असं पडळकर म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा