28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरधर्म संस्कृतीकोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळे वैतागली

कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळे वैतागली

Related

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून यंदाही गणेशोत्सव साजरे करण्यावर निर्बंध घातले आहेत. शासनातंर्गत घालून दिलेल्या नियमानुसारच उत्सव साजरा करावा, असे आदेश पालिका प्रशासनाने आता दिलेले आहेत. परंतु गणेशमूर्ती उंचीचा आणि मिरवणुकांबाबतचा निर्णय मान्यच नसल्याचे सांगत याबाबत राज्य शासनाकडे हा निर्णय प्रलंबित असल्याचा दावा मंडळांच्या प्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे आता गणेशमूर्तीची उंची आणि मिरवणुका यावर ठाकरे सरकार काय निर्णय घेणार याकडे मंडळांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे यंदाही गणेश उत्सवावर निर्बंधांचे सावट असणार का असाच प्रश्न आता मंडळांना पडलेला आहे.

ठाकरे सरकारकडून लावलेल्या निर्बंधांविरोधात आता अनेक मंडळांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच मंडळांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात या विरोधात महापालिका मुख्यालयासमोर आंदोलनही केले होते. तरीही अजून प्रशासनाकडून मात्र गणेश मूर्ती तसेच मिरवणुका यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. सध्याच्या घडीला रुग्णसंख्या कमी आहे, तसेच लसीकरण सुरू आहे. तरीही गणेशोत्सवावर जुनेच निर्बंध का, असा प्रश्न उपस्थित करत हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती. परंतु राज्य शासनाने आखून दिलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यावर पालिका प्रशासन ठाम आहे. यामुळे पालिका प्रशासन विरुद्ध गणेशोत्सव मंडळे असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे.

हे ही वाचा:

राजकुमार हिरानी यांच्या मुलाच्या नावाने बोगस इन्स्टाग्राम खाते

प्रतीक्षा संपली! दहावीच्या मुलांचा निकाल उद्या लागणार

…आणि त्याने साकारली मोदी ‘बँक’

गोवंडीतील उद्यानाला टिपूचे नाव द्यायला शिवसेनेचा छुपा पाठिंबा

राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच राहून गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने मंडळांना केल्या आहेत. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीच्या नियमाबाबत तसेच मिरवणुकांमध्ये किती लोकांचा सहभाग असावा या दोन मुद्द्यांवर मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये नाराजी कायम आहे. त्यामुळे किमान या नियमांचा फेरविचार करण्याची मागणी मंडळांनी शासनाकडे केली आहे. परंतु याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा