30.6 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरक्राईमनामाबापरे! पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल

बापरे! पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल

Google News Follow

Related

सणासुदीचे दिवस जवळ आले की, शहरामध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबईतून दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणात पकडण्यात आली होती. अन्न व औषध विभागाच्या भेसळ विभागाने मोठी कारवाई करून दुधाची भेसळ करणारे पकडले होते. याच धर्तीवर आता शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खवा-मावा, दूध, तूप तसेच पाकिटबंद लोणी यांत भेसळ होण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्याचबरोबर आता पनीरमध्ये भेसळ होत असल्याचेही समोर आले आहे. भेसळयुक्त पदार्थांचे प्रमाण शहरांमध्ये वाढत चालले आहे.

अशापद्धतीने होणारी ही भेसळ आरोग्यासाठी प्राणघातक ठरणारी आहे. पनीरची किमत तुलनेने जास्त असल्यामुळे, निव्वळ नफा कमवण्याच्या उद्देशाने पनीरमध्ये दुधाच्या ऐवजी खाद्यतेलाचा वापर केल्याचे नुकतेच समोर आलेले आहे. मुंबईतील जीटीबी नगर आणि भिवंडीमध्ये पनीरमध्ये खाद्यतेलाची भेसळ करण्याचे उघडकीस आले आहे. या कंपन्यांवर छापा टाकून तब्बल २ हजार ३५० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले गेले आहे.

हे ही वाचा:
खडसे यांच्या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी

कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळे वैतागली

…आणि त्याने साकारली मोदी ‘बँक’

टिपूला डोक्यावर घेऊन नाचण्याचे कसले उफराटे राजकारण

एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार, जीटीबीनगरमधील एका दुग्धालयात छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी छापा टाकल्यानंतर पनीरकरण्यासाठी तेलाची भेसळ केल्याचे समोर आले. दुधाच्या वाढत्या किमती पाहता, गेल्याच आठवड्यात दुधामध्ये भेसळ केलेल्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तोवर आता दुधाच्या जागी पनीरमध्ये तेल टाकण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. हा प्रकार म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग आहे. तसेच २५० किलो पनीर जीटीबीनगरमधून जप्त करत ते नष्टही करण्यात आले. या पनीरची किंमत बाजारभावाप्रमाणे ४६ हजार रुपये इतकी असून, हे सर्व नमुने प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक आयुक्त बी. डी. मुळे आणि अन्न निरीक्षक एल. एस. साळवे, तात्या लोखंडे यांनीही या कारवाईत सहभाग घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा