29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणठाकरे सरकार आणि व्हेंटिलेटर गफला

ठाकरे सरकार आणि व्हेंटिलेटर गफला

Google News Follow

Related

कोरोना संकटाच्यावेळी ठाकरे सरकार प्रत्येकवेळी केंद्र सरकारवर आरोप करत आहे. सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय घेऊन वाईट गोष्टींचे दोष केंद्राकडे सारत आहे. यातच व्हेंटीलेटर्सच्या बाबतीत ठाकरे सरकारने केलेला घोटाळा आता समोर आला आहे. ठाकरे सरकारने केंद्राकडून मिळालेले व्हेंटीलेटर्स खासगी रुग्णालयाला विकल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी या विषयावर ट्विट करून ही माहिती दिली आहे.

भातखळकरांनी केलेल्या ट्विटमध्ये पत्रकार प्रसाद काथेंनी केलेला सविस्तर खुलासा शेअर केला आहे. त्यामध्ये प्रसाद काथेंनी पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. १९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले. यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वापरात असलेले २० व्हेंटिलेटर गुपचूप एमजीएम रुग्णालयात लावले गेले. एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर लावताना उत्पादक कंपनीला कसलीही कल्पना दिली गेली नाही. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी गुपचूप एमजीएम खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर नेऊन लावले. एमजीएम संस्था एका काँग्रेस नेत्याच्या आशीर्वादाने चालवली जाते.

वरील १०० पैकी आणखी ३ व्हेंटिलेटर सिग्मा खासगी रुग्णालयात लावले गेले. औरंगाबाद वैद्यकीय रुग्णालयात वापरात असलेले व्हेंटिलेटर हटवून ते सिग्मा रुग्णालयात लावले गेले. सरकारी रुग्णालयात सुस्थितीत आणि वापरात असलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात वळवले गेले, हे विशेष. चौकशी अहवाल सांगतोय की, औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त नाहीत. व्हेंटिलेटर उत्पादकाच्या सल्ल्याशिवाय संयंत्र वापरण्याचा प्रयत्न झाला. योग्य पद्धतीने व्हेंटिलेटर न वापरता आल्याने ते बिघडल्याच्या तक्रारी आल्या. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात १९/४/२१ रोजी १०० व्हेंटिलेटर पाठवले. या १०० पैकी ४५ व्हेंटिलेटर उत्पादकाच्या कर्मचाऱ्यांनी बसवून सुरू करून दिले.

उरलेले ५५ व्हेंटिलेटर बीड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली इथं पाठवण्यात आले. त्यापैकी ५० व्हेंटिलेटर सुस्थितीत आणि कार्यरत आहेत. मात्र, ५ व्हेंटिलेटर बीड रुग्णालयात अजूनही आदेशाविना पडून आहेत. २३/एप्रिल/२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला आणखी ५० व्हेंटिलेटर पाठवले गेले. त्यापैकी, ४८ व्हेंटिलेटर अद्यापही स्थानिक प्रशासनाकडून सूचना न मिळाल्याने पडून आहेत.

हे ही वाचा:

डीआरडीओचे कोरोनावरील औषध आता रुग्णांसाठी उपलब्ध

तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली

टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच

कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

ठाकरे सरकारने कोविडच्या काळात केलेला हा आणखी एक घोटाळा आता उघड झाला आहे. त्यामुळे यावर आता ठाकरे सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा