29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणरंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

रंगकर्मींना खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले

Google News Follow

Related

कोविड लॉकडाऊनमुळे गेले दीड वर्ष विविध क्षेत्रातील रंगकर्मींना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे या रंगकर्मींमध्ये ठाकरे सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आपल्याकडे सरकारने या अडचणीच्या काळात पाठ फिरवल्याचे दुःख रंगकर्मीना आहे. त्यामुळे आज राज्यभर ठाकरे सरकार विरोधात रंगकर्मी आंदोलन करत आहेत.

भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही या विषयावर ट्विट केले आहे. “कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने अनेक रंगकर्मीना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आज राज्य सरकारविरोधात रंगकर्मी आंदोलन करणार आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकाला या खंडणीखोर सरकारने वाऱ्यावर सोडून दिले आहे. इतके संवेदनाहीन सरकार महाराष्ट्राने यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते.” असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

या लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांवर आणि रंगभूमीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींवर तर आत्महत्या करण्याचीही वेळ आली आहे. या क्षेत्रातील ८० टक्के कर्मचारी हे रोजंदारीवर जगतात. अशावेळी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे राज्य सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. रंगकर्मींच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे रंगकर्मींमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

हे ही वाचा:

रेल्वेशी चर्चा न करताच ठाकरे सरकारची घोषणा

अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेने तलवार नाचवली

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रेल्वेनिर्णयाचा एकच डोस, बाकी ओस

नाटक, सिनेमा मालिका यांच्याबरोबरच, भजन, किर्तन, भारुड, गोंधळ तसंच तमाशासारख्या लोककलांना हे कलाकार जिवंत ठेवत असतात. आज लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना हे सगळे कलाविष्कार बघता येत नाहीयेत. परंतु या कलाकारांवर मोठंच संकट कोसळलं आहे. प्रेक्षक नसल्याने कलाकारांचं उपजीविकेचं साधनच नष्ट झालं आहे. अनेक रंगकर्मी रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे आज अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत कलाकारांनी काही मागण्या सरकारकडे ठेवल्या आहेत. राज्यभरातील तमाम रंगकर्मी या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा