26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरराजकारणगुलामीच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी नामांतराचा निर्णय

गुलामीच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी नामांतराचा निर्णय

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्टीकरण

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरास कुणी विरोध करू नये. काही जण यास जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘नामांतराला कोणताही जातीय वा धार्मिक अँगल नाही. याकडे गुलामीच्या पाऊलखुणा पुसण्याच्या दृष्टीने बघा. गुलामीच्या खुणा कुणीच ठेवत नाही म्हणून औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णंय घेण्यात आला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाढिदवसानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात आक्रांत्यांचा पुरस्कार करत नाही, त्यांचा सन्मान होत नाही. आक्रमणाच्या पाऊल खुणा सर्वजण पुसून टाकतात. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला स्वतःचा नाही तर इतरांचा विचार करायला शिकवले आहे. जेव्हा जेव्हा देशाला मदतीची गरज पडली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने ताकदीने मदत केली आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती आहे. असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

सत्तेचा वाटा सर्व घटकपक्षांना देणार

शिवसेना आणि भाजपसह इतर सर्व मित्रपक्षांचे हे सरकार जनसामान्याच्या साठीचे सरकार आपण स्थापन केले आहे. शिवसेना आणि भाजपचे सरकार असले तरी सत्तेचा वाटा सर्व घटकपक्षांना देणार अशी ग्वाही देतानाच सर्व घटकपक्षांना सत्तेत स्थान देत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचा या सरकारचा हेतू असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार केला

मागचे सरकार नालायक होते त्यांनी एकाही समाजाला न्याय दिला नाही. मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण त्यांनी घालवले. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम त्यांनी केले. गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला अशी टीका यावेळी मेटे यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा