29 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणबाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!

बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!

Related

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिले आहे. जर बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊन मेळघाटचा स्काय वाँक पूर्ण होणार असेल आणि पर्यटन वाढून लोकांना रोजगार मिळणार असेल तर आमची काही हरकत असणार नाही,असा टोला त्यांनी पत्रातून लगावला आहे.

विदर्भाच काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात ४०७ मिटर लांबीचा तब्बल ३४.३४ कोटी रुपये खर्च करून देशातीला पहिला असा स्कायवॉक नावारूपाला येत आहे. या स्कायवॉकच्या निर्मितीनंतर चिखलदरा मधील पर्यटनाला अजून मोठी चालना मिळणार आहे. २०२१ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असतांना मात्र, अद्यापही काम रखडले आहे. चिखलदऱ्यातील स्कायवॉकला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण त्याचे काम जलदगतीने करा, अशी मागणी नवनीत राणांनी आदित्य ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे.

हे ही वाचा:

रिलायन्सकडून अक्षय ऊर्जेत मोठी गुंतवणूक

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा

स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले दौरा अर्धवट टाकून दिल्लीला

तर दुसरीकडे स्काय वाँकचं काम हे सिडको अंतर्गत होत असून ते अधिकारी मात्र, काम बंद नाही फॉरेस्ट विभागाची एक एनओसी अजून मिळाली नाही ती प्रक्रियेत आहे लवकरच ती मिळेल अशी माहिती दिली. त्यामुळे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या खासदार नवनीत राणांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची अचानक मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यामुळे नवनीत राणा यांनी पुन्हा शिवसेनेचा चिमटा तर नाही काढला ना असा अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा