33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणसगळं मोदीच करणार तर मग तुमची गरजच काय?

सगळं मोदीच करणार तर मग तुमची गरजच काय?

Google News Follow

Related

आजपर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारने नेहमीच आपल्याकडची कुठलीही गोष्ट केंद्रावर ढकलायचेच काम केले. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणत आहेत. हुकूमाची पानं त्यांच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

प्रविण दरेकर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांना फटकारले. भाजपाला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे. मात्र, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते. संजय राऊत यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपावर बोलल्याशिवाय चैन पडत नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी राज्यपालांना पत्र दिलं होतं. मात्र, त्या माध्यमातून आरक्षण मिळवणं इतकं सोपं आहे का?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल. यासाठी बराच वेळ जाईल. मात्र, ठाकरे सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा घट, १.७३ लाख नवे रुग्ण

ओबीसी आरक्षणाला दणका, ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

उल्हासनगरात स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला हवेत महागातले कॉन्सन्ट्रेटर

भाजपाचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा