29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामा"...तर तुम्ही खूनच केला असता"- सुधीर मुनगंटीवार

“…तर तुम्ही खूनच केला असता”- सुधीर मुनगंटीवार

Google News Follow

Related

जळगाव वसतीगृहातील प्रकारावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी आक्रमक भाषेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. “जळगावातील वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर? हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तर असा प्रकार झाला असता तर तुम्ही खूनच केला असता.” असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

“इतक्या घृणास्पद घटनेनंतरही राज्य सरकार फक्त नोंद घेऊ म्हणते. विरोधी पक्षातील आमदार काय मेलेल्या मनाचे आहेत का? आमचं मन जिवंत आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. अशा प्रकारानंतर किती तासात संबंधितांवर कारवाई करणार? हे सरकारने सांगायला पाहिजे. हे पाप तुम्हाला फेडावे लागेल.” अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

हे ही वाचा:

“या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे”- सुधीर मुनगंटीवार

“सध्या या प्रकरणात संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच कठोर कारवाई केली जाईल.” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. जळगाव प्रकरणातील बातमी चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला. “आम्ही कारवाई करु, असे सांगायला ही घटना काही पाच मिनिटांपूर्वी घडलेली नाही. घटना होऊन बरेच तास उलटून गेले आहेत. त्यानंतरही पोलिसांकडून चौकशी होत नाही. अशी परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी मागणी मला करावी लागेल.” असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा