30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरराजकारणबांग्लादेशातून आले, केरळचे मतदार झाले

बांग्लादेशातून आले, केरळचे मतदार झाले

Google News Follow

Related

सोमवारी केरळच्या मुख्य निवडणूक अधिकारी टीका राम मीना यांनी केरळच्या राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षातर्फ़े राजयोतील मतदार यादीत घोळ करण्यात आल्याचे मीना यांनी म्हटले आहे. हजारो लोकांची मतदार यादीत दोन वेळा नावे असल्याचे आढळून आले आहे. केरळ मधील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी या संबंधीची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मतदार यादीत घोळ करून अस्तित्वात नसलेली चार लाख खोटे मतदार यादीत घुसवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर केरळमध्ये वीस लाखांच्या आसपास बांग्लादेशी घुसखोर मतदार असल्याचाही आरोप होत आहे.

या आधी जानेवारी महिन्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री के.सी.जोसेफ यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. “सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाने त्यांच्या पक्षाकडे झुकलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. त्यांच्यामार्फत खोटी नावे केरळच्या मतदार यादीत घुसवण्यात येत आहेत.” असे आरोप जोसेफ यांनी केले होते.

हे ही वाचा:

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

कोणाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या अहवालावर कारवाई केली नाही? – आ.अतुल भातखळकर

मुंबईत, महाराष्ट्रात नोंदवली गेली आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

तर प्राध्यापक स्टॅनली सबॅस्टिअन याने याच प्रकारचे गंभीर आरोप करत केरळच्या मतदारांमध्ये बांग्लादेशी आणि रोहिंग्या असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. “२००५ सालापासून केरळ मध्ये वास्तव्य करत असलेले वीस लाख रोहिंग्या आणि बांग्लादेहासी हे केरळचे मतदार आहेत. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना हे घुसखोर पश्चिम बंगाल आणि आसाम मधून केरळमध्ये आले आणि स्थायिक झाले.” असे सबॅस्टिअन यांचे म्हणणे आहे. “त्याकाळात केरळमध्ये सत्तेत असलेल्या एलडीएफ आणि युडीएफ सरकारने या घुसखोरांना रेशन कार्ड्स वाटली असेही प्राध्यापक स्टॅनली सबॅस्टिअन यांचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा