31 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण तृणमूल कार्यकर्त्यांचा सीबीआय कार्यालयावर हल्ला

तृणमूल कार्यकर्त्यांचा सीबीआय कार्यालयावर हल्ला

Related

पश्चिम बंगालच्या एका मंत्र्यासह टीएमसीच्या चार नेत्यांना सीबीआयने अटक केल्याने पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. मंत्री आणि नेत्यांना अटक केल्याने संतप्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालयात जाऊन सीबीआय अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. तर टीएमसी कार्यकर्त्यांनी राजभवनाला घेराव घातला आहे. या हाय व्होल्टेड ड्राम्यामुळे बंगालमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. हजारो हिंदूंना पलायन करायला भाग पडल्यानंतर आता टीएमसीचे गुंड थेट राज्यपालांवर आणि सीबीआयवर आक्रमक होत आहेत.

आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. तसेच भाजपचे एकेकाळचे नेते सोवन चॅटर्जी यांच्या घरीही छापेमारी केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सोवन चॅटर्जी यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने जमावाला पांगवण्यासाठी केंद्रीय वाहिनीच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. या जवानांनी टीएमसी कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या जवानांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे. या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

तौत्के वादळ: रायगडमध्ये दोन महिलांचा मृत्यू

उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?- भाजपा

केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले

…आणि इस्लामिक देश आपापसातच भांडले

इकडे ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालयात दाखल झालेल्या असतानाच नारदा प्रकरणी राज्यपाल जगदीप धनखड यांनी खटला भरण्याची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ टीएमसी कार्यकर्त्यांनी राजभवनला घेराव घातला आहे. राजभवनाच्या नॉर्थ आणि साऊथ गेटवर उभं राहून टीएमसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. राज्यपाल पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तर टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. आपला कोर्टावर पूर्ण भरोसा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा