31 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरराजकारणशर्जिल इमाम, उमर खालिद, ध्रूव राठी नव्हेत स्मित माछर माझा हिरो!

शर्जिल इमाम, उमर खालिद, ध्रूव राठी नव्हेत स्मित माछर माझा हिरो!

उबाठाचे प्रवक्ते आनंद दुबेेंचा राजीनामा

Google News Follow

Related

उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा सादर केला असून आपली पक्षात घुसमट होत असल्याचा आणि कोणतीही भूमिकाच घेऊ शकत नसल्याचा दावा करत हेच राजीनाम्याचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.  हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या विचारांशी तडजोड करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले.

ते म्हणाले की, माझे आदर्श शरजील इमाम किंवा उमर खालिद नाहीत. ध्रुव राठीही माझा आदर्श नाही. माझा आदर्श आहे स्मित माछर! भारतापुरतेच नव्हे, तर संपूर्ण जगाला बजरंगबलीची अफाट शक्ती दाखवून देणारा हा माणूस माझ्यासाठी आदर्श आहे. मात्र, आमच्या पक्षाकडून त्याच्याबाबत एकही ट्विट करण्यात आले नाही. आनंद दुबे यांनी ही व्यथा पत्रकार परिषद घेऊन मांडली.

ते म्हणाले की, “मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा राजीनामा देत आहे. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि राष्ट्रीय प्रवक्तेपद या दोन्ही जबाबदाऱ्यांपासून मी स्वतःला पूर्णपणे वेगळे करत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून मी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांपर्यंत पक्षाची भूमिका सातत्याने मांडत आलो आहे. मग आता काय बदलले? कोणतीही गोष्ट एका रात्रीत घडत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून मी मनातल्या मनात त्रस्त होतो आणि प्रचंड मानसिक अस्वस्थतेचा सामना करत होतो.

हे ही वाचा:

‘दीपस्तंभ’ची त्या मुलींना साथ, ‘भारतीय स्त्री शक्ती’चा मदतीचा हात

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या गुलाम मोहम्मदचे घर जप्त

काँग्रेस खासदार बिमोल अकोईजाम यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा

जंतर मंतर आता छू मंतर

माझ्या मनापासून जवळच्या असलेल्या हिंदुत्वाच्या आणि सनातन धर्माच्या विचारांची भूमिका मांडणे मला आता शक्य होत नाही, अशी माझी परिस्थिती झाली आहे. प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारधारा असते. मी वीर सावरकरांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आणि स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे पालन करणारा पक्षकार्यकर्ता आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मी माझे आदर्श मानतो. मात्र सावरकरांचा अपमान होत असताना, हिंदुत्वाचा अपमान होत असताना ते पाहावले नाही. मला पक्षाच्या वतीने जे बोलायचे आहे किंवा जी भूमिका मांडायची आहे, ती माझ्या विचारांशी जुळत नाही, असे मला जाणवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा