26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारण'उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार'

‘उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार’

Related

उद्धव ठाकरे यांचे उद्गार

अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला त्यांनी पदावरून खाली खेचलं, यातून त्यांना पुण्य मिळत असेल तर त्यांना ते पुण्य मिळू दे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पद सोडतोय याची मला अजिबात खंत नाहीय, शिवसेना कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. उद्यापासून मी शिवसेना भवनात लोकांसाठी बसणार आहे. पुन्हा एकदा मी भरारी घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

बुधवार, २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे लोकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रथम महाविकास आघाडी सरकारची वाटचाल चांगली झाली असून, याचे मला समाधान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यांनतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड साठी निधी उभा केला तिथूनच कामाची सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. पीक विमा योजना अश्या प्रकारची बरीच कामे केलीत, मात्र एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

औरंगाबादच नामकरण करून संभाजीनगर केलं, उस्मानाबादच नामकरण करून धाराशिव नगर केल्यामुळे मला समाधान वाटतं आहे. पण आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब, सुभाष आणि मी असे चौघेच जण बैठकीला उपस्थित होतो. आपली म्हणणारी निघून गेलीत याचीच खंत वाटते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. राज्यपाल भगातसिंह कोश्यारी यांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. ज्यांनी आपल्यला मोठं केलं त्यांना विसरले. रिक्षावाले, टपरीवाले यांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं तेच शिवसेनेला विसरले, अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
१९ जूनला शिवसेनेला ५६ वर्ष पूर्ण झालीत. शिवसेना पाहत नाही तर अनुभवत आलोय. अनेक लोक यावेळी मातोश्रीवर येऊन धीर देत होते. मात्र ज्यांना शिवसेनेनं दिल त्यांनीच नाराज केलं आणि लोकांनी धीर दिला. याच नात्याच्या जोरावर शिवसेना पुन्हा हिमतीने उभी करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे त्याचं पालन करणं आवश्यक आहे. लोकशाहीचे पालन झालंच पाहिजे, मी राज्यपालांचे आभार मानतो, केवळ एका पत्रानंतर लगेच त्यांनी हालचाल केली आणि बहुमत सिद्ध करायला सांगितलं. जे लोक दगा देणार असं सांगितलं गेलं, त्यांनी साथ दिली. आपली नाराजी होती तर सुरतमध्ये किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन सांगायला हवं होतं. माझे लोक विरोधात गेले हे माझ्यासाठी लज्जास्पद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

मविआ सरकार कोसळलं; उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा

न्यायालयाची आणखी एक थप्पड, बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश

“मदरशांमध्ये धर्माविषयी निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते”

“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

उद्या लोकशाहीचा नवा जन्म होईल. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्यावं. लोकशाहीचा नवा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की, उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचं पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे,असं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा