28 C
Mumbai
Friday, July 23, 2021
घरराजकारणमुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहातायत!

मुख्यमंत्री महाराष्ट्राला ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहातायत!

Related

राज्यात आजपासून पुन्हा एकदा निर्बंधांची मालिका ठाकरे सरकारने सुरु केलेली आहे. यावर आता भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका करताना म्हटले आहे की, डेल्टापासून बचाव की, पळ?  पुन्हा एकदा बंदी आणून महाराष्ट्राला बंदीराष्ट्र बनवत आहे. शहरांना टाळं लागल्यावर रोजीरोटीसाठी पुन्हा झगडावं लागणार असे म्हणता भातखळकरांनी मविआ सरकारवर टीकेची झोड उठवली.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात

तिसरी लाट तोंडावर; पण ठाकरे सरकार गाफील

अनिल देशमुख यांनी ईडीकडे मागितला वेळ

गुन्हेगारी टोळ्यांची धुंदी उतरवणार एनसीबी

राज्यात पुन्हा एकदा निर्बंधांची मालिका आता सुरु झालेली आहे. तिसरी लाट तोंडावर आहे म्हणून ठाकरे सरकारने आता पुन्हा एकदा नागरिकांवर बंदी घातलेली आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी मोकळा श्वास घेण्याची सुरुवात केली होती. परंतु लगेच आता निर्बंध लादण्यात येणार असल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांना रोजीरोटीची चिंता लागलेली आहे.

रोजीरोटीसाठी बाहेर पडणेच मुश्कील झाल्यावर जगायचे कसे असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. आजपासून आता सर्व जिल्हे तसेच महापालिकांना तिसरा टप्पा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे दुकाने केवळ संध्याकाळी ४ पर्यंतच खुली राहतील. यामुळे व्यापारी वर्गही आता नाराज झालेला आहे.

कोरोनाची वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टाप्लसचे रुग्ण यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिला आणि दुसरा टप्पा नियमावली लागू करता येणार नाही असे ठाकरे सरकारचे म्हणणे आहे. निव्वळ जबाबदारी झटकण्याच्या हेतूने सतत निर्बंध लादून सरकार अंग काढून घेत आहे का, असा सवाल जनसामान्यांकडून विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,288अनुयायीअनुकरण करा
1,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा