33 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन

नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन कॉलवर धमकी देण्यात आली

Google News Follow

Related

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपीने फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी आणि त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्ब शोधक- नाशक पथक तसेच सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन कॉलवर धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी तातडीने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलीस या फोन कॉलची चौकशी करत आहेत.

विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी देखील नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. पण, त्यानंतरही पुन्हा तसाच प्रकार घडत असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’

अतुल खिरवडकर राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे सीईओ

नवी ‘केरळ स्टोरी’; तरुणीने मदरशात लावून घेतला गळफास

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका

नितीन गडकरी यांना जानेवारी महिन्यात पहिली धमकी मिळाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आले होते. धमकी देणाऱ्या आरोपींनी १० कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच धमकी देणाऱ्या आरोपीने स्वत:चं नाव जयेश पुजारी असल्याचं म्हटलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा