31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरराजकारणवसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

पत्र लिहित मांडली भूमिका

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा, असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे. यापूर्वी सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे.

वसंत मोरे यांनी पत्र लिहित त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिल्याचे वसंत मोरे म्हणाले आहेत.

तसेच त्यांनी पक्षांतर्गत होत असलेल्या राजकारणावर मौन सोडले आहे. यामुळे त्यांच्या पक्षाप्रति असलेल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत आणि उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे आणि म्हणून मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे कारण वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा..

जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

गुंड आणि दहशतवाद्यांच्या संबंध प्रकरणी एनआयएकडून ३० ठिकाणी छापेमारी

यापूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी सकाळी फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा