अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात केली होती. ट्रम्प यांनी त्यांच्या टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भारतीय वंशाचे असलेले विवेक रामास्वामी यांनाही ट्रम्प सरकारमध्ये मोठ्या पदाची जबाबदारी मिळाली होती. उद्योजक एलॉन मस्क यांच्यासमवेत रामास्वामी हे डिपार्टमेंट ऑफ गव्हरमेंट एफिशियंसी (DOGE) प्रमुख असणार होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी याची माहिती दिली होती. मात्र, आता ट्रम्प यांच्या शपथविधी नंतर विवेक रामास्वामी हे DOGE चे काम पाहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसने विवेक रामास्वामी यांच्या निर्णयाची घोषणा केली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये उद्योगपती एलॉन मस्क यांच्यासोबत DOGE विभागाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड केली होती, परंतु आता रामास्वामी यांनी DOGE विभागात सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यांचा मार्ग त्यांनी वेगळे वेगळा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या निर्णयाची चर्चा होत असतानाचं यामागील कारण स्पष्ट करण्यात आले आहे.
विवेक रामास्वामी यांनी २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीत आपले नाव चर्चेत आणले होते. आता, त्यांनी पुढील वर्षी ओहायोच्या गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढवण्याची योजना आखली आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शपथविधीनंतर लगेचच रामास्वामी यांच्या या निर्णयाची घोषणा करण्यात आली. ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्मसाठी अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या वेगळे होण्याची घोषणा करण्यात आली.
विवेक रामास्वामी यांनी आम्हाला DOGE तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे आयोगाच्या प्रवक्त्या यांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यांचा निवडणूक लढवण्याचा मानस आहे आणि त्यासाठी ज्यासाठी त्यांना DOGE च्या बाहेर राहणे आवश्यक आहे. गेल्या दोन महिन्यांतील त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यात ते त्यांची महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा करतो, असंही म्हटले आहे.
हे ही वाचा:
छत्तीसगड- ओडिशा सीमेवरील गरियाबंदमध्ये १४ नक्षलवादी ठार
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात दिसले भारताचे महत्त्व; जयशंकर यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान
मुस्तफा काग्गा टोळीच्या चार गुंडांचा उत्तर प्रदेश एसटीएफकडून खात्मा
मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’
रामास्वामी यांनी या निर्णयाची पुष्टी करताना म्हटले की, ते लवकरच ओहायोबद्दलच्या त्यांच्या योजना उघड करतील. DOGE च्या निर्मितीला मदत करणे हा माझा सन्मान होता. ओहायो मधील माझ्या भविष्यातील योजनांबद्दल खूप काही सांगायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यास मदत करू!







