पाकिस्तानकडून खतपाणी घातल्या जाणाऱ्या दहशतवादाची जगाला माहिती देण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल इतर देशांना सांगण्यासाठी भारत सरकारने शिष्टमंडळ काही महत्त्वाच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे देखील या शिष्टमंडळाचा भाग आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “सध्याच्या माहितीनुसार मी ज्या गटात आहे त्याचे नेतृत्व बैजयंत जय पांडा करतील. या गटात निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू आणि गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. तसेच आमचे शिष्टमंडळ हे युके, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, इटली आणि डेन्मार्क या देशंमध्ये जाणार आहे.” असदुद्दीन ओवैसी म्हणले की, यावेळी काम असे असणार आहे की, जगाला कळायला हवे की, पाकिस्तान आपला देश कसा अस्थिर करू इच्छित आहे आणि या भेटीत सर्व तथ्येही सादर केली जातील.
“आम्ही भारत सरकार आणि आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही त्या देशांमध्ये जाऊन आमच्या मुली कशा विधवा होत आहेत, आमची मुले अनाथ होत आहेत आणि पाकिस्तान आमच्या देशाला कसे अस्थिर करू इच्छित आहे हे सांगणार आहोत. आपण पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. जर भारतात अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारात २१ नागरिकही मारले गेले आहेत. चार मुले मारली गेली. पाच जवान हुतात्मा झाले. आम्ही हे सर्व देशांसमोर मांडू. आम्ही आमच्या क्षमतेनुसार भारत सरकारचा दृष्टिकोन सादर करू,” असा विश्वास असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा..
“पाकिस्तानमध्ये असे काहीही नाही जे भारतीय सैन्याच्या आवाक्याबाहेर आहे”
शशी थरूर यांना शिष्टमंडळाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळताच काँग्रेसची आगपाखड
देशविरोधी कारवाया प्रकरणी हरियाणामधील ट्रॅव्हल ब्लॉगर महिलेला अटक
नोएडात दोन नायजेरियन नागरिकांना अटक
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सततच्या लढाईच्या संदर्भात, या महिन्याच्या अखेरीस सात सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहे. सात शिष्टमंडळांचे नेतृत्व खासदार शशी थरूर, रविशंकर प्रसाद, संजय कुमार झा, बैजयंत पांडा, कनिमोझी करुणानिधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे हे करणार आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताचा दहशतवादविरोधातील मुकाबला करण्यासाठीचा दृढ संकल्प मांडतील. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा देशाचा संदेश जगासमोर घेऊन जातील. तसेच प्रत्येक शिष्टमंडळात विविध पक्षांचे संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि प्रतिष्ठित राजनयिक सहभागी असतील.
