34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणयोगींबद्दल, अमित शहांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले होते ते पाहा!

योगींबद्दल, अमित शहांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले होते ते पाहा!

Google News Follow

Related

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत विचारला जाब

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. नारायण राणेंनी या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या काही वक्तव्यांची आठवण करून दिली.

ते म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सेनाभवनाबद्दल बोलताना वापरलेले शब्द असंसदीय नव्हते का?  ज्याला देशाचा अभिमान नसतो, त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. मला देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य मला सहन झालं नाही. म्हणूनच मी ते बोललो. ते महाशय काय बोलल? सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबाड तोडा, आदेश दिले. हा गुन्हा नाही का? १२० बी होत नाही ? पत्रकारांनी मला सांगावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे.

राणे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलेने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला हे म्हणतात चपलेने मारलं पाहिजे. काय सुसंस्कृतपणा आहे पाहा. का असे म्हणाले मुख्यमंत्री ? काय वाकडे केले त्यांनी तुमचे? आणि अमित शाह यांच्याबद्दलही ते बोलले होते. त्यांचे वाक्य होते, ‘मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आखणी केली होती, आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो.’ हा असंसदीय शब्द नाही? माहीत असून विधानसभेत असंसदीय शब्द वापरला. आपले आधी तपासले पाहिजे. याच्यात तो गाळलेला शब्द आहे. काय हो माननीय पवार साहेब? काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं ते चुकीचं केलं असं मला वाटत नाही. काय भाषा आहे? आम्ही राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो.

हे ही वाचा:

मोदी सरकारकडून ऊस शेतकऱ्यांना मोठी भेट

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’

भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे, असेही राणे यांनी सांगितले. आपली जनआशीर्वाद यात्रा अशीच सुरू राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा