25 C
Mumbai
Saturday, January 17, 2026
घरदेश दुनियाव्हेनेझुएलाच्या मादुरोंना अटक केल्यावर राष्ट्राध्यक्ष झालेल्या रॉड्रिगेझ कोण?

व्हेनेझुएलाच्या मादुरोंना अटक केल्यावर राष्ट्राध्यक्ष झालेल्या रॉड्रिगेझ कोण?

Google News Follow

Related

अमेरिकेच्या सशस्त्र दलांनी व्हेनेझुएलामध्ये घुसखोरी करत राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतल्यानंतर, व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेझ यांना हंगामी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय अशा वेळी जाहीर करण्यात आला, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्य काही काळ व्हेनेझुएलामध्येच राहून योग्य सत्तांतर होईपर्यंत देश चालवेल, असे वक्तव्य केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर सरकार स्थापन करण्याच्या आशेने विरोधी गट जल्लोष करत होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, घटनात्मक खंडपीठाने दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, व्हेनेझुएला राज्याची प्रशासकीय सलगता कायम ठेवण्यासाठी डेल्सी रोड्रिग्ज तात्पुरत्या स्वरूपात देशाची सूत्रे हाती घेतील.

सध्याच्या परिस्थितीत शासन, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय संरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर चौकटीवर न्यायालय पुढील चर्चा करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काराकस आणि वॉशिंग्टन यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला असून, व्हेनेझुएलामध्ये सध्या सत्ता कोणाच्या हातात आहे, याबाबत परस्परविरोधी दावे समोर येत आहेत.

हे ही वाचा:

ईसीआयनेट अ‍ॅप सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने नागरिकांकडून सूचना मागवल्या

हे ड्रग्सचे नाही, तेलाचे प्रकरण

नागरिक बांगलादेशी असल्याचे सांगितल्यावर बीएलओवरच हल्ला

ट्रम्प म्हणतात, आता मेक्सिको, क्युबा आणि कोलंबियाकडे लक्ष

व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेने केलेल्या गंभीर लष्करी आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीची अटक ही व्हेनेझुएलाच्या संविधान, देशांतर्गत कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

डेल्सी रोड्रिग्ज कोण आहेत?

डेल्सी रोड्रिग्ज या व्हेनेझुएलाच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि ओळखल्या जाणाऱ्या नेत्या आहेत. त्यांचा जन्म १८ मे १९६९ रोजी काराकस येथे झाला असून त्या सध्या ५६ वर्षांच्या आहेत. त्यांचे कुटुंब राजकीय आणि क्रांतिकारी विचारधारेशी घट्ट जोडलेले आहे.

त्या जॉर्ज अँटोनियो रोड्रिग्ज यांच्या कन्या आहेत. जॉर्ज रोड्रिग्ज हे १९७० च्या दशकात Liga Socialista या डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे संस्थापक आणि गुरिल्ला नेते होते. व्हेनेझुएलाच्या समाजवादी चळवळीतील समर्थक त्यांना साम्राज्यवादाविरोधात लढणारा क्रांतिकारक म्हणून स्मरतात. या वारशाचा डेल्सी रोड्रिग्ज यांच्या राजकीय विचारसरणीवर लहानपणापासूनच खोल प्रभाव पडला.

डेल्सी रोड्रिग्ज यांनी देशातील प्रतिष्ठित सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ व्हेनेझुएला येथून कायद्याचे शिक्षण घेतले. वकील म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या बोलिव्हेरियन चळवळीच्या उदयानंतर सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्या आणि समाजवादी सरकारच्या ठाम व आक्रमक समर्थक म्हणून ओळख निर्माण केली.

राजकारणातील झपाट्याने झालेली वाटचाल

२०१३ ते २०१४ या काळात त्यांनी माहिती आणि दळणवळण मंत्री म्हणून काम केले. या काळात देशात राजकीय अस्थिरता असताना सरकारची माध्यम रणनीती ठरवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

२०१४ ते २०१७ दरम्यान त्या परराष्ट्र मंत्री होत्या. या काळात अमेरिकेसह युरोपियन युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. २०१७ मध्ये व्हेनेझुएलाला Mercosur व्यापार गटातून निलंबित केल्यानंतर ब्युनोस आयर्समधील बैठकीस उपस्थित राहण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न मोठ्या राजनैतिक संघर्षाचे कारण ठरला.

२०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी त्यांची संविधान सभा (Constituent Assembly) प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या सभेने विरोधकांच्या नियंत्रणाखालील संसदेला बाजूला सारून मादुरो यांचे अधिकार अधिक मजबूत केले. त्यामुळे रोड्रिग्ज या त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून उदयास आल्या.

जून २०१८ मध्ये मादुरो यांनी त्यांची उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्या वेळी एक्स (माजी ट्विटर)वर पोस्ट करताना मादुरो यांनी त्यांचे वर्णन “तरुण, धाडसी, अनुभवी, शहीदाची कन्या, क्रांतिकारक आणि हजारो लढायांत पारंगत” असे केले होते.

अर्थव्यवस्था आणि तेल क्षेत्रातील महत्त्वाची भूमिका

राजकीय ताकदीसोबतच डेल्सी रोड्रिग्ज या व्हेनेझुएलाच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. त्यांनी एकाच वेळी उपराष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री आणि तेलमंत्री अशी पदे भूषवली असून, त्यामुळे देशाच्या आर्थिक दिशेवर त्यांचा मोठा प्रभाव आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये मादुरो यांनी अधिकृतपणे तेल मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवली. अमेरिकेच्या वाढत्या निर्बंधांच्या काळात देशाच्या सर्वात महत्त्वाच्या उद्योगाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. तेल हे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेचे कणा असून, निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्यात, उत्पादन आणि खासगी क्षेत्राशी संबंध सांभाळण्याचे काम त्यांनी केले.

विशेष म्हणजे, समाजवादी विचारसरणी असूनही, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी त्यांनी अलिकडच्या काळात तुलनेने व्यवहार्य (orthodox) आर्थिक धोरणे राबवली. त्यामुळे खासगी क्षेत्रातील काही घटकांमध्येही त्यांचा प्रभाव वाढला आहे.

त्या आपल्या भावासोबत, जॉर्ज रोड्रिग्ज (सध्याचे राष्ट्रीय सभाध्यक्ष), जवळून काम करतात. दोघे मिळून मादुरो सरकारमधील एक प्रभावशाली राजकीय केंद्र तयार करतात.

ट्रम्प यांचा दावा : “रोड्रिग्ज यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी”

शनिवारी, ३ जानेवारी रोजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानांमुळे परिस्थिती आणखी चिघळली. ट्रम्प यांनी दावा केला की डेल्सी रोड्रिग्ज यांनी आधीच राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे आणि त्या वॉशिंग्टनशी सहकार्य करण्यास तयार आहेत. ट्रम्प यांनी याहून पुढे जात, “अमेरिका तात्काळ व्हेनेझुएला चालवणार आहे”, असे विधान केले. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात आली आणि व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, हे दावे व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ फेटाळून लावले आणि काराकसमधील घडामोडींनी ट्रम्प यांच्या विधानांना छेद दिला.

रोड्रिग्ज यांचा प्रतिवाद, मादुरोंच्या जीविताचा पुरावा मागितला

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या दोन तासांतच डेल्सी रोड्रिग्ज यांनी राज्य दूरदर्शनवरून देशाला संबोधित केले. त्या रशियात असल्याच्या बातम्या असतानाही त्यांनी काराकसमधूनच हे भाषण केले. “या देशात एकच राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांचे नाव निकोलस मादुरो मोरोस आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. अमेरिकेने ताब्यात घेतले असले, तरी मादुरो हेच व्हेनेझुएलाचे वैध राष्ट्राध्यक्ष असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

तसेच, त्यांनी अमेरिकेकडे मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांच्या जिवंत असल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी केली. अमेरिकेच्या कारवाईची कायदेशीरता आणि नैतिकता यावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “व्हेनेझुएलासोबत जे केले जात आहे, ते अमानुष आहे. आम्ही मुक्त राहण्याचा निर्धार केला आहे,” असे त्या म्हणाल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा