35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मालमत्तेवर महाविकास आघाडीचा डोळा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मालमत्तेवर महाविकास आघाडीचा डोळा

Google News Follow

Related

तब्बल १२३ वर्षांच्या जुन्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादरमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव रचला जात आहे. या संस्थेत महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे तालेवार नेते सहभागी आहेत. येत्या २४ ऑक्टोबरला होणाऱ्या संस्थेच्या निवडणुकीत संस्थेच्या घटनेची संपूर्ण मोडतोड करून ही संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून सुरू आहे.

या प्रथितयश संस्थेची गेल्या काही वर्षांत अत्यंत वाईट अवस्था झाली असून सदस्यांची तोकडी संख्या, दर्जेदार पुस्तकांची विक्री होत असल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांना अल्प वेतन, त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप, या संस्थेला डबघाईस आणण्याचा प्रयत्न, निवडणुका न घेता वर्षानुवर्षे त्याच मंडळींच्या हाती संस्थेचा कारभार यामुळे येत्या काळात संस्थेची जागा हडप करून तिथे पुनर्विकास करण्याचा आणि ती जागा कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आहे, असे आरोप आता होऊ लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे या संस्थेच्या अध्यक्षपदी गेली ३० वर्षे आहेत. २४ ऑक्टोबरला या संस्थेच्या प्रथमच होत असलेल्या निवडणुकीत शरद पवार अध्यक्षपदासाठी उभे आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने या संस्थेची झालेली बिकट अवस्था आता समोर येऊ लागली आहे.

दादर येथील मोक्याच्या ठिकाणी या संस्थेची मुख्य इमारत आहे. पण या संस्थेचे उत्पन्नाचे मार्ग हळूहळू बंद झालेले आहेत. सदस्यांची संख्या वाढविण्याचा कधीही प्रयत्न झालेला नाही. कोणतेही व्हीजन या संस्थेच्या उत्कर्षासाठी ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे ही संस्था डबघाईस यावी आणि ही मोक्याची जागा हस्तगत करता यावी असा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यानिमित्ताने केला जाऊ लागला आहे. या संस्थेत महाविकास आघाडीतील तीन पक्षांशी संबंधित नेते, समर्थक यांचा भरणा आहे. निवडणूक अधिकारीही या आघाडीतील एका पक्षाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ही निवडणूकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ती घटनेला धरून व्हावी यासाठी ती पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती, पण त्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली.

आतापर्यंत एकदाही निवडणूक न झालेल्या या संस्थेत यावेळी २४ ऑक्टोबरला निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे राहिले आहेत. त्यांना संस्थेचे एक सदस्य धनंजय शिंदे यांनी आव्हान दिले आहे. पण या संस्थेत मतदान करणाऱ्यांची संख्या आहे अवघी ३४. उमेदवारांनाही मतदानाचा अधिकार नाही, असा विचित्र नियम असलेली ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे.

या संस्थेच्या ४० पेक्षा अधिक शाखा होत्या, पण ती संख्या घसरून आता २९ शाखा आहेत आणि त्यातून निव्वळ ३४ जणांना या संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

धनंजय शिंदे यांनी या सगळ्या घोळाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी संस्थेची ही इमारत उभी आहे. ही संस्था गेल्या काही वर्षांत विपन्नावस्थेत नेऊन संस्थेची मालमत्ता गिळंकृत करण्याचाच घाट घातला जात आहे का, असा संशय धनंजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारांनाच मतदानाचा अधिकार नाही, असा नियम असणारी जगातील ही पहिलीच निवडणूक आहे, असेही शिंदे यानी म्हटले आहे.

 

हे ही वाचा:

ट्विटरचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा उघड

शिवसेना खासदार भावना गवळी ईडीला म्हणतात, मुदतवाढ द्या!

काश्मीरमध्ये शोध मोहीम तीव्र; दोन दहशतवाद्यांना केले गारद

उत्तर प्रदेशच्या विकासाची गगनभरारी! कुशीनगर विमानतळाचे लोकार्पण

 

अध्यक्षपदासाठी शरद पवार यांना आव्हान देणारे धनंजय शिंदे यांच्याशी याच सगळ्या घोळासंदर्भात ‘न्यूज डंका’ने केलेली विशेष बातचीत यू ट्युबवर बुधवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी आपल्याला पाहता येणार आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अवस्थेला कोण कोण कारणीभूत आहे, याचा गौप्यस्फोट या खास मुलाखतीत होणार आहे. तेव्हा newsdanka.com या बेवसाईटला भेट देऊन ही मुलाखत पाहा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा