31 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण भाजपा कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाणीनंतर संतापाचे वातावरण

भाजपा कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाणीनंतर संतापाचे वातावरण

Related

जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड केल्यामुळे युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजपा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे.

हा व्हीडिओ ९ एप्रिलचा आहे. दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाला होता. त्याला जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान दर्शन देवावले याचा मृत्यू झाला. दर्शनच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डची तोडफोड केली होती.

यानंतर जालना पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे पोलीस पथक घटनास्थळी आले. त्यावेळी तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे या व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत आहे. कारण काहीही असलं तरी अशा अमानुष मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही.

हे ही वाचा:

जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

लॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?

हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक

मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?

दरम्यान, जालना शहरातील भाजपा कार्यकर्ता शिवराज नारियलवाला याला अमानुष मारहाण करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी माळशिरसचे भाजपा आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवरुन केली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा