28.7 C
Mumbai
Friday, July 17, 2026
घरस्पोर्ट्स'आम्हाला काहीच फुकट मिळालेलं नाही'!

‘आम्हाला काहीच फुकट मिळालेलं नाही’!

टीकाकारांना मेसीचे सडेतोड प्रत्युत्तर, फायनलपूर्वी ठणकावला दावा

Google News Follow

Related

फीफा विश्वचषक २०२६च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा धडक मारल्यानंतर संघाचा कर्णधार लिओनेल मेसी याने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान अर्जेंटिनाला पंचांच्या निर्णयांचा फायदा मिळत असल्याचे आरोप होत असताना, मेसीने हे सर्व दावे फेटाळून लावत “आम्हाला काहीच फुकट मिळालेलं नाही; प्रत्येक यशामागे आमची मेहनत आणि संघर्ष आहे,” असे ठामपणे सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने २-१ अशी थरारक बाजी मारली. ५५व्या मिनिटाला अँथनी गॉर्डनच्या गोलमुळे इंग्लंडने आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या क्षणी मेसीच्या दोन अप्रतिम असिस्टच्या जोरावर एन्झो फर्नांडेज आणि लाउतारो मार्टिनेज यांनी गोल करत अर्जेंटिनाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले.

सामन्यानंतर बोलताना मेसी म्हणाला, “लोक काहीही बोलोत, पण गेली चार वर्षे आम्ही जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहोत. सलग दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही साधी गोष्ट नाही. हे आमच्या कठोर परिश्रम, सातत्य आणि संघर्षाचे फळ आहे. आम्हाला काहीच फुकट मिळालेले नाही.”

स्पर्धेदरम्यान अर्जेंटिनाला अनुकूल निर्णय मिळाल्याच्या आरोपांबाबतही मेसीने स्पष्ट भूमिका घेतली. “जर आम्ही इंग्लंडविरुद्ध हरलो असतो, तर टीकाकारांकडे बोलण्यासाठी अनेक विषय असते. पण मैदानावर आमच्या खेळाडूंनीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली,” असे तो म्हणाला.

यावेळी मेसीने हा ऐतिहासिक विजय अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांना समर्पित केला. “इंग्लंडविरुद्धचा हा विजय डिएगोसाठीही विशेष असता. मला खात्री आहे की ते वरून हा क्षण आनंदाने पाहत असतील. त्यांना हा आनंद देणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असे भावनिक उद्गार मेसीने काढले.

आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनासमोर स्पेनचे आव्हान असणार असून जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा