31.2 C
Mumbai
Tuesday, June 16, 2026
घरस्पोर्ट्सजपानवर २-१ मात करत भारत उपांत्य फेरीत, गुणतालिकेत अव्वल

जपानवर २-१ मात करत भारत उपांत्य फेरीत, गुणतालिकेत अव्वल

एफआयएच महिला नेशन्स कप

Google News Follow

Related

एफआयएच महिला हॉकी नेशन्स कप २०२६ मध्ये भारताने पूल ‘अ’मधील दुसऱ्या सामन्यात जपानचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. भारताने आतापर्यंतचे दोन्ही साखळी सामने जिंकत शानदार कामगिरी कायम राखली आहे.

ऑकलंडमधील नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटर येथे झालेल्या या सामन्यात भारताकडून कर्णधार सलीमा टेटे (३३वे मिनिट) आणि लालरेमसियामी (४९वे मिनिट) यांनी गोल केले. जपानकडून एई हिरामित्सु (३५वे मिनिट) हिने एकमेव गोल नोंदवला.

हा सामना भारतीय मध्यरक्षक ज्योती हिच्यासाठी विशेष ठरला. तिने आपल्या कारकिर्दीतील १००वा वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

सामन्याचा पहिला हाफ अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत संधी निर्माण केल्या, मात्र मध्यंतरापर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी घेतली. ३३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नवनीत कौर हिचा प्रयत्न निक्की प्रधान हिने अचूकपणे सलीमा टेटेकडे वळवला आणि सलीमाने चेंडू जाळ्यात धाडत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र, जपानने अवघ्या दोन मिनिटांतच पुनरागमन केले. हिरामित्सु हिने ३५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

अंतिम क्वार्टरमध्ये भारतासाठी लालरेमसियामी हिने निर्णायक गोल केला. ४९व्या मिनिटाला सुशीला चानू पुखरामबम हिने सर्कलच्या कडेकडून दिलेल्या अचूक पासचे रूपांतर लालरेमसियामीने गोलमध्ये करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली.

या विजयासह भारताने अमेरिका आणि जपानविरुद्धच्या विजयातून मिळालेल्या ६ गुणांसह पूल ‘अ’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारत अद्याप स्पर्धेत अपराजित आहे.

भारताचा साखळी फेरीतील अखेरचा सामना १८ जून रोजी उरुग्वेविरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या जागेसाठी जपान आणि अमेरिका यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा